आणि भले भले वाघ मी रडताना पाहिले ..
आणि भले भले वाघ मी रडताना पाहिले ...
चार भिंतीच्या आत हे दुःख मी सहन केलं
आणि भले भले वाघ इथ मी रडताना पाहिले...
भयाण काळोखी ती रात्र होती ,
बंदी जीवनाची माझी ती सुरवात होती...
धुताना ताट-वाट्या डोळे अश्रूंनी वाहिले
आणि भले भले वाघ इथ मी रडताना पाहिले ...
घेण्यासाठी भत्ता (जेवण ) इथे रांगा लागती मोठी,
आठवण येते आई-वडिलांची ती शिकवण नव्हती खोटी..
याचसाठी घरचे दिवस मला येथे आठवले
आणि भले भले वाघ इथ मी पांघरुणात रडताना पाहिले ...
अभिवक्ती स्वातंत्र्याची किंमत तेव्हा कळली जेव्हा इच्छा नसताना केस-दाढी काढावी लागली
आणि भले भले ते वाघ इथ मी रडताना पाहिले...
येईल माझी मुलाखत (घरच्यांची भेट)हि चिंता सतावते मनाला,
येता नाव भोंग्यवर मुलाखतीचे होई आनंद त्या मनाला,
सूरवात होता मुलाखतीला ना वेळेचे भान मला राहिले
तेथेही भले भले वाघ मी रडताना पाहिले...
संपता वेळ मुलाखतीची काचेतून बघतो मी घरच्यांना ,
आनंदित आहे मी खोटं सांगतो सर्वांना ..
माघारी येता जाळीत (कोठडी)मी माझे डोळे असुरले
आणि भले भले वाघ इथ मी रडताना पाहिले...
नको कुणालाही हे आयुष्य चार भिंतीतले आत,
म्हणून आई वडील सांगायचे चांगल्याची पकड साथ...
उंच झेप घेणाऱ्या पक्षाचे पंख इथे छाटले ..
चार भिंतीच्या आतले दृष्य इथे म्हणून मी मांडले आणि
भले भले वाघ इथ मी रडताना पाहिले..रडताना पाहिले
#story_behind_Bars_
Comments
Post a Comment